दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे आरोपीस गुन्हे शाखा युनिट ३ कडून शिताफीने अटक
पुणे : पुणे शहरात दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेला पुन्हा एकदा यश आले आहे. उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत दाखल असलेल्या दरोड्याच्या गंभीर गुन्ह्यातील पाहिजे व रेकॉर्डवरील आरोपीस गुन्हे शाखा युनिट ३ ने शिताफीने जेरबंद केले असून, या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यास पोलीस प्रशासनाला मोठे बळ मिळाले आहे. दिनांक १४ डिसेंबर २०२५ रोजी गुन्हे शाखा, युनिट ३ चे पोलीस अमंलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर, किशोर शिंदे, पुरुषोत्तम गुन्ला, योगेश झेंडे व तुषार किंद्रे हे वरिष्ठांच्या आदेशानुसार पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या उद्देशाने सिंहगड रोड, नांदेड सिटी व उत्तमनगर पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. याच दरम्यान पोलीस अमंलदार पुरुषोत्तम गुन्ला व योगेश झेंडे यांना गोपनीय बातमीदारामार्फत अत्यंत महत्त्वाची व खात्रीलायक माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीनुसार उत्तमनगर पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर क्रमांक १४५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३०९ (६)...