सहकारनगरमध्ये ज्येष्ठ नागरिकाची ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली तब्बल २२.९० लाखांची ऑनलाइन फसवणूक


पुणे : ऑनलाईन फसवणुकीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना सहकारनगर परिसरात एका ७६ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल २२ लाख ९० हजार रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. मनी लाँड्रींग प्रकरणात अडकवल्याचा बनाव करून अज्ञात सायबर गुन्हेगारांनी फोनद्वारे भीती निर्माण करत फिर्यादी यांचा विश्वास संपादन केला आणि मोठी रक्कम उकळली. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी इसम वय ७६ वर्षे, रा. सहकारनगर, पुणे यांना दि. ७ नोव्हेंबर २०२५ ते दि. ११ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत अज्ञात मोबाईलधारकांनी सातत्याने फोन केले. कॉल करणाऱ्या व्यक्तींनी स्वतःला तपास यंत्रणेशी संबंधित अधिकारी असल्याचे भासवून फिर्यादी यांच्या विरोधात मनी लाँड्रींगचा गंभीर गुन्हा नोंद असल्याचे सांगितले. तसेच प्रकरण मिटवायचे असल्यास तात्काळ सहकार्य करण्याची गरज असल्याचे भासवून फिर्यादी यांना मानसिक दबावाखाली ठेवण्यात आले. आरोपींनी फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून विविध कारणे सांगत वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ऑनलाईन माध्यमातून रक्कम भरण्यास भाग पाडले. या कालावधीत फिर्यादी यांची एकूण २२ लाख ९० हजार रुपये किमतीची आर्थिक फसवणूक झाली. नंतर संशय बळावल्यानंतर फिर्यादी यांनी सहकारनगर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून सहकारनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ५३३/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८(४), ३१९(२), ३(५) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम ६६(डी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्यात मोबाईलधारक तसेच बँक खातेधारक व वापरकर्ते हे आरोपी असून, अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) जयंत राजुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास