केवायसी अपडेटच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची ९.४९ लाखांची ऑनलाइन फसवणूक


पुणे : कोथरूड परिसरात केवायसी अपडेट करण्याच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक होत असल्याचा आणखी एक गंभीर प्रकार समोर आला आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अज्ञात मोबाईलधारकाविरोधात तपास सुरू आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या गुन्हा क्रमांक ३५६/२०२५ नुसार भारतीय न्याय संहिता कलम ३१८ (४), ३१९ (२) तसेच आयटी अॅक्ट कलम ६६ (डी) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणातील फिर्यादी या ६७ वर्षीय महिला असून त्या कोथरूड, पुणे येथे वास्तव्यास आहेत. दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी ऑनलाइन माध्यमातून हा प्रकार घडला. फिर्यादी यांच्या मोबाईलवर एका अज्ञात व्यक्तीने केवायसी अपडेट करण्यासंदर्भात संदेश पाठवला. संबंधित संदेशावर विश्वास ठेवून फिर्यादी यांनी केवायसी अपडेट करण्यासाठी मोबाईल स्क्रीन शेअर केली. याच दरम्यान आरोपीने फिर्यादी यांच्या मोबाईल व बँक खात्याचा गैरवापर करत एकूण ९ लाख ४९ हजार ९९९ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. सदर आरोपी हा मोबाईलधारक तसेच बँक खातेधारक असून सध्या त्याला अटक करण्यात आलेली नाही. घटनेनंतर फिर्यादी यांनी कोथरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस अंमलदार करीत असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.


मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास