कोथरुडमध्ये ज्येष्ठ महिलेच्या बंद फ्लॅटमध्ये घरफोडी; साडेतीन लाखांचा ऐवज लंपास


पुणे : कोथरुड परिसरात घरफोडीच्या घटनेने खळबळ उडाली असून, अज्ञात चोरट्यांनी बंद असलेल्या फ्लॅटचे कुलूप उचकटून रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून अज्ञात आरोपींचा शोध सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला वय ६५ वर्षे, रा. कोथरूड, पुणे या आपल्या राहत्या फ्लॅटला कुलूप लावून बाहेर गेल्या असताना ही चोरी घडली. दि. ८ डिसेंबर २०२५ रोजी दुपारी साडेएक वाजल्यापासून ते दि. १० डिसेंबर २०२५ रोजी रात्री दहा वाजेपर्यंतच्या कालावधीत, पुजा अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक १०, तिसरा मजला, कर्द कोटी नर्सिंग होमजवळ, उजवी भुसारी कॉलनी, कोथरुड येथे अज्ञात इसमाने मुख्य दरवाजाचे कुलूप कशाच्यातरी सहाय्याने उचकटले. दरवाजा उघडल्यानंतर चोरट्यांनी घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटाची झडती घेतली. कपाटात ठेवलेली ६० हजार रुपये रोख रक्कम तसेच सोन्याचे दागिने असा एकूण ३ लाख ६१ हजार रुपये किमतीचा ऐवज त्यांनी चोरी करून नेला. घरफोडीचा प्रकार लक्षात येताच फिर्यादी यांनी तात्काळ कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून कोथरुड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ३५४/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५ (अ), ३३१ (३) व ३३१ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.


मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास