अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; नराधमाला पोलिसांनी केली अटक


पुणे : १६ वर्षाच्या अल्पवयीन मतिमंद मुलीला सार्वजनिक स्वच्छतागृहात नेऊन तिच्यावर भरदुपारी लैंगिक अत्याचार करणार्‍या नराधमाला खडक पोलिसांनी अटक केली आहे. शाम ज्ञानोबा हातागळे (वय ५०, रा. घोरपडे पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत पीडित मुलीच्या आजीने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ज्येष्ठ महिलेची १६ वर्षाची नात मतिमंद आहे. ती सोमवारी ३० जून रोजी दुपारी घरासमोर खेळत होती. त्या वेळी आरोपी हातागळे तेथे आला त्याने मुलीला आमिष दाखवून वसाहतीतील सार्वजनिक स्वच्छतागृहात नेले. तेथे मुलीला धमकावून त्याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या घटनेमुळे घाबरलेल्या मुलीने आजीला याची माहिती दिली. त्यानंतर आजीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. हातागळे याच्याविरुद्ध मंगळवारी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गु्न्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक जाधव तपास करत आहेत.

मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास

पिस्टलचा धाक दाखवणाऱ्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी केली अटक; इटालियन बनावटीचे पिस्टल जप्त