पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं


पुणे : पुण्यात पतीने पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. शनिवारी सायंकाळी पतीने पत्नीला गोड बोलून लॉजवर नेलं. तिथं दारु प्यायलयानंतर तिचा खून केला. पत्नीचा खून केल्यानंतर रात्री मित्रांसोबत दारु प्यायला बसल्यावर आपण पत्नीचा खून केल्याचं मित्रांना सांगितलं. हे ऐकताच मित्रांच्या पायाखालची जमीन सरकली. मित्रांनी पोलिसात याची माहिती दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
     याबाबत मिळालेली माहिती अशी की, कृष्णा कदम आणि त्याची पत्नी काजल हे दोघेही मजुरी करून उदरनिर्वाह करत होते. दोघांमध्ये काही महिन्यांपासून वाद सुरू होते. याच वादातून दोघानी घटस्फोटाचाही निर्णय घेतला. पण वाद विसरून त्यांनी पुन्हा एकत्र यायचं ठरवलं होतं. कृष्णाने पत्नीशी गोड बोलून सातारा रस्त्यावर असणाऱ्या लॉजमध्ये आणलं. तिथे दोघेही दारु प्यायले. यानंतर दोघांमध्ये वाद झाला आणि याच वादात कृष्णाने तिचा चाकूने गळा चिरला. पत्नीचा खून केल्यानंतर कृष्णाने लॉजच्या रूमला बाहेरून कडी लावली आणि तो तिथून पसार झाला. सायंकाळी पत्नीचा खून केल्यानंतर कृष्णा मित्रांसोबत रात्री दारु प्यायला बसला. त्यावेळी त्याने मित्रांना आपण पत्नीचा खून केल्याचं सांगितलं. कृष्णाने हे सांगताच मित्र घाबरले आणि त्यांनी पोलिसांना ही माहिती दिली. सातारा रोडवर असणाऱ्या लॉजवर जाऊन पोलिसांनी तपासले असता रक्ताच्या थारोळ्यात काजलचा मृतदेह पडला असल्याचं दिसून आलं. या प्रकरणी आरोपी कृष्णाला ताब्यात घेतलं आहे. त्यानेच पत्नीचा लॉजवर नेऊन खून केला असल्याचं समोर आलंय. या घटनेची नोंद पोलिसात झाली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास