पिस्टलचा धाक दाखवणाऱ्या आरोपीला विश्रांतवाडी पोलिसांनी केली अटक; इटालियन बनावटीचे पिस्टल जप्त


पुणे : विश्रांतवाडी पोलिस स्टेशनच्या क्रॉप्स २४ आणि तपास पथकाने तात्काळ आणि धडक कारवाई करत पिस्टलचा धाक दाखवत मारहाण करणाऱ्या इसमाला अटक केली आहे. ही घटना दि. ४ जून २०२५ रोजी दुपारी साडे चारच्या सुमारास टिंगरेनगर, लेन नं. ११ येथे घडली. या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, डायल ११२ वर एका नागरिकाने फोन करून "टिंगरेनगर परिसरात एक इसम पिस्टल घेऊन भांडण करत आहे" अशी माहिती दिली. माहिती मिळताच आळंदी मार्शल पथकाचे अंमलदार पोलीस शिपाई लंघे आणि पोलीस शिपाई माळी, तसेच विश्रांतवाडी पोलिस तपास पथकाचे अंमलदार पोलीस हवालदार बादरे आणि पोलीस शिपाई मुसारे तातडीने घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पोहोचताच त्यांनी पाहिले की, तौफीक ऊर्फ रकीब रफीक शेख (वय ३२), रा. सावंत पेट्रोल पंपासमोर, श्रमिक वसाहत, येरवडा, पुणे हा एका व्यक्तीला पिस्टलचा धाक दाखवून मारहाण करत होता. पोलिसांनी प्रसंगावधान राखून आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीची झडती घेतली असता त्याच्या जवळ इटालियन बनावटीचे एक पिस्टल व ३२ एमएम चा एक जिवंत राऊंड आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या पिस्टलची किंमत अंदाजे ५०,००० रुपये तर राऊंडची किंमत सुमारे ५,००० रुपये असून एकूण ५५,००० रुपयांचा मुदतेमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या प्रकरणी विश्रांतवाडी पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध गुरनं १३८/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ३५२, ३५१(३), भारतीय हत्यार कायदा कलम ३ (२५), महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७(१)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा,  अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ हिंमत जाधव, सहा. पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबडे, विश्रांतवाडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, पोलीस अंमलदार बबन वणवे, यशवंत किर्वे, कृष्णा माचरे, अमजद शेख, वामन सावंत, संजय बादरे, संपत भोसले, विशाल गाडे, धवल लोणकर, संदीप देवकाते, अक्षय चपटे, किशोर भुसारे, प्रमोद जाधव व आळंदी मार्शलचे अंमलदार पोशि लंघे व पोशि माळी यांनी केली आहे.

मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास