बेकायदेशीर बांगलादेशी महिलांची बुधवार पेठेतून पोलिसांकडून धरपकड; परकीय नागरिकांच्या उपस्थितीबाबत गंभीर प्रश्न


पुणे : शहराच्या मध्यवर्ती भागातील बुधवार पेठेतील ‘रेड लाईट’ परिसरातून पुणे पोलिसांनी विशेष मोहिम राबवून आठ बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले आहे. या महिलांनी बेकायदेशीररित्या भारतीय सीमेत प्रवेश करून पुण्यात वास्तव्य केल्याचे उघड झाले आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात अनधिकृतपणे वास्तव्यास असलेल्या परदेशी नागरिकांच्या उपस्थितीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. फरासखाना पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार बुधवार पेठ परिसरात काही बांगलादेशी महिला राहात असून त्या वेश्याव्यवसायात सहभागी असल्याचे समजले. या माहितीच्या आधारे फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखालील पथकाने अँटी-टेररिस्ट सेलच्या सहकार्याने बुधवारी रात्री छापा टाकला. या कारवाईत रूपाली बेगम अकबर शेख (वय ३८), मन्सुरा रफिक हवालदार अख्तर (वय १९), सीमा अलमगीर शेख (वय ४५), अंजुरा बेगम कामरुल चौधरी (वय ४०), खदीजा बेगम महाबुर शेख (वय २७), पारोल बेगम मिठु शेख (वय ३८), तंजीला बेगम अलमगीर काझी (वय ४०) आणि रिनाखातून फोजर गाजी (वय ३२) या आठ महिलांना ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक चौकशीत या महिलांनी आपण मूळच्या बांगलादेशातील रहिवासी असल्याचे मान्य केले असून, त्यांनी भारतीय सीमेत बेकायदेशीर प्रवेश केल्याचे कबूल केले आहे. विशेष म्हणजे, पुण्यात आल्यानंतर त्यांनी स्वत:ला पश्चिम बंगालमधील रहिवासी म्हणून सादर केले व बुधवार पेठ परिसरात वेश्याव्यवसायात सक्रिय असल्याचे आढळले. या सर्व महिलांवर विदेशी नागरिक कायदा तसेच अन्य संबंधित भारतीय दंडविधानातील कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या पोलिस त्यांची कसून चौकशी करत असून त्यांच्या भारतात प्रवेशाच्या मार्गांची, त्यांना मदत करणाऱ्या संभाव्य स्थानिक व्यक्तींची आणि त्यामागे असलेल्या रॅकेटची चौकशी सुरू आहे. पोलिसांच्या या धडक कारवाईने शहरात अनधिकृतपणे राहणाऱ्या परदेशी नागरिकांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. महाराष्ट्रात गेल्या काही काळात बांगलादेशी घुसखोरीसंदर्भात अनेक कारवाया करण्यात आल्या असून, ही कारवाई त्याचाच एक भाग आहे.

मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास