विश्रांतवाडीतील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेला तरुण पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार


पुणे : विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या गुन्हे अभिलेखावरील रोहन उर्फ प्रेम संदीप साळवे (वय १९, रा. स.न. ८८/१, रामगड वस्ती, कळस, पुणे) या आरोपीवर पुणे पोलिसांनी कठोर कारवाई करत संपूर्ण पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. पोलिस उपायुक्त, परिमंडळ ४, पुणे शहर यांच्या कार्यालयातून दिनांक १४ जून २०२५ रोजी तडीपार आदेश क्रमांक २२/२०२५ अन्वये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६(१)(अ)(ब) अंतर्गत हा आदेश काढण्यात आला होता. त्या आदेशानुसार साळवे याला पुढील एक वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. संबंधित आरोपीच्या विरोधात विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांची नोंद असून तो गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून समाजात दहशत निर्माण करतो, असा अहवाल पोलिसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सादर केला होता. त्या अनुषंगाने सदर आदेश देण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी आवश्यक ती सर्व प्रक्रिया पूर्ण करून दिनांक १८ जून २०२५ रोजी सदर तडीपार आदेशाची अंमलबजावणी केली असून, आरोपीला पुणे जिल्ह्याच्या हद्दीबाहेर पाठविण्यात आले आहे. सदरची कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील, पोलीस उपआयुक्त परिमंडळ ४ हिंमत जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त खडकी विभाग विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव, पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले, पोलीस हवालदार शिंदे, पोलीस अंमलदार हसबे (सर्वेलन्स) यांनी केली आहे. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून गुन्हेगारी प्रवृत्तीला चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत असल्याचा पुनरुच्चार यानिमित्ताने झाला आहे.

मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास