झोपेत असताना बलात्कार, ब्लॅकमेल करून लाखो रुपयांची पिळवणूक; आरोपी अटकेत


पुणे : गेली चार वर्षे एकत्र राहात असताना झोपेत असलेल्या तरुणीवर बलात्कार केल्याप्रकरणी सुधीर अर्जुन पाटील (वय ३४, रा. रुक्मिणी अपार्टमेंट, आंबेगाव खुर्द) याला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने बलात्काराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये चित्रीत केला आणि तो इंटरनेटवर व्हायरल करण्याची धमकी देत वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला. तसेच १६ लाख ८४ हजार रुपयांची आर्थिक पिळवणूक केली. ही घटना १२ ऑगस्ट २०२१ रोजी मध्यरात्री १ वाजता आंबेगाव खुर्द येथे घडली. फिर्यादी आणि आरोपी हे त्या वेळी एकत्र राहत होते. झोपेत असताना पाटील याने तिच्यावर जबरदस्ती केली आणि तिचे नग्न व्हिडिओ चित्रीत करून सोशल मीडियावर टाकण्याची धमकी देऊन पुढील काही वर्षे सतत शारीरिक, मानसिक आणि आर्थिक छळ केला. तिच्याकडून रोख स्वरूपात ११ लाख ९ हजार रुपये व ऑनलाईन स्वरूपात ५ लाख ७५ हजार रुपये जबरदस्तीने वसूल करण्यात आले. यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, तपास सहायक पोलीस निरीक्षक थोरात करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात आरोपी सुधीर पाटील यानेही एका घटनेबाबत पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, २७ मे २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान, आंबेगाव बुद्रुक येथील सिंहगड कॅम्पसमधील शांताई हाइट्स येथे फिर्यादी तरुणी व गावातील आणखी चार जणांनी मिळून त्याच्या घरात जबरदस्तीने प्रवेश केला. या पाच जणांनी त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर, त्याच्या बँक खात्यावरून फोन पे अ‍ॅपद्वारे ८५ हजार रुपये हस्तांतरित केले. त्याच्या ऑफिस बॅगमधून ४२ हजार रुपये रोख घेतले. त्याचबरोबर राहत्या खोलीतील लॅपटॉप व शैक्षणिक कागदपत्रे असलेली बॅग जबरदस्तीने घेऊन गेले. शिवाय, आरोपीच्या वडिलांकडेही पैसे मागून धमकी दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास सहायक पोलीस निरीक्षक परदेशी करत आहेत.

मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास