हडपसर, जेजुरीत घरफोडी करणाऱ्या तीन अल्पवयीन आरोपींना अटक; ३.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त


पुणे : हडपसर व जेजुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडी करणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना हडपसर पोलिसांच्या तपास पथकाने ताब्यात घेतले आहे. या अल्पवयीन आरोपींकडून पोलिसांनी एकूण ३ लाख ८५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. यात सोन्याचे दागिने, लॅपटॉप्स आणि एक दुचाकी यांचा समावेश आहे. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत नुकत्याच झालेल्या घरफोडीच्या प्रकरणाचा तपास सुरु असताना तपास पथकाने स्थानिक परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून व मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पथकाने तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्यांनी हडपसर आणि जेजुरी हद्दीत झालेल्या घरफोड्यांची कबुली दिली. तपासात उघड झाले की, या अल्पवयीनांनी गेल्या दोन महिन्यांत वेगवेगळ्या वेळी तीन घरफोड्या केल्या. हडपसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन तर जेजुरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक गुन्हा केल्याचे त्यांनी कबूल केले. यामध्ये त्यांनी २ लाख ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, ६० हजारांचे लॅपटॉप्स आणि एक दुचाकी असा एकूण ३.८५ लाखांचा मुद्देमाल चोरल्याचे समोर आले आहे. सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, पोलीस निरीक्षक (गुन्हे), निलेश जगदाळे, यांच्या सुचनांप्रमाणे तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक हसन मुलाणी, सत्यवान गेंड, अंमलदार अविनाश गोसावी, दिपक कांबळे, अमित साखरे, निलेश किरवे, बापु लोणकर, अमोल दणके, अजित मदने, अभिजीत राऊत, तुकाराम झुंजार, महेश चव्हाण, कुंडलीक केसकर, चंद्रकांत रेजितवाड, महाविर लोंढे, लखन दांडगे, सागर कुंभार यांच्या पथकाने केली आहे.

मुख्य संपादक : संतोष सावंत

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

पुण्यात गोड बोलून पत्नीला लॉजवर नेलं, गळा चिरून संपवलं

टँकर चालकाकडून अडीच लाखाची खंडणी उकळणाऱ्या हडपसर येथील बोगस पत्रकारांवर खंडणीचा गुन्हा दाखल

वडकीत सापडले 67 डिटोनेटर; बीडीडीएस पथकाकडून तपास